Skip to main content

Dr. Ranjan Kelkar Mulakhat


भारताच्या हवामान वेधशाळेचे निवृत्त महासंचालक आणि नामवंत हवामान तज्ज्ञ डॉ.रंजन केळकर यांची २० जानेवारी २०१२ रोजी कोल्हापूरच्या शाहू स्मारकात प्रा.अतुल आयरे आणि अभिजित घोरपडे यांंनी प्रकट मुलाखत घेतली होती, त्याचा संक्षिप्त वृत्तांत -
हवामान शास्त्रज्ञ हे भविष्यवादी नाहीत

मान्सून हा बलशाली व अवाढव्य आहे. त्याच्यावर फार थोड्या घटकांचा प्रभाव असतो. मेघदूताला (कालिदासाने लिहिलेले काव्य) चौथ्या शतकात हे कळले. याचा अर्थ त्याच्या आधी शतकानुशतके पाऊस असलाच पाहिजे. सबंध मानव जात तेव्हापासून अस्तित्वात आहे कारण पाऊस होता. एखाद्या क्षुल्लक कारणामुळे तो नाहीसा होणार नाही. `आज ऋतुचक्र बदलले, पाऊस कमी झाला हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे' असे काही लोक म्हणतात. गेल्या २०० वर्षांची पावसाची शास्त्रीय आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. या आकडेवारीवरून तसं काहीही झालेलं नाही. सरळ रेषेप्रमाणे तो चालत आहे. मान्सूनचा पाऊस यापुढे वाढेल, तो कमी होणार नाही. पाऊस वाढला तर ग्लोबल वॉर्मिंग वाईट नाही. जास्त पाऊस पडला तर अधिक पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. जाहिरातीत `दाग अच्छे है' असं दाखवितात. त्याप्रमाणे `पाऊस जास्तीचा होऊ द्या' म्हणून ग्लोबल वॉर्मिंगला आपण तरी भिण्याचं कारण नाही.

जितके वैज्ञानिक तितकी पावसाची चक्रं. प्रत्येक वैज्ञानिक एक चक्र शोधून काढतो. काहींनी दीड वर्षांची, अडीच वर्षांची चक्रे काढली. मुख्य चक्रे दोन आहेत. पृथ्वी स्वत:भोवती फिरते, त्यामुळे दिवसरात्र होतात. हे चोवीस तासांचे चक्र आहे. पृथ्वीचा अक्ष सरळ नाही, कललेला आहे. असा अक्ष सूर्याभोवती फिरतो. उन्हाळा व हिवाळा हे दोन्ही ऋतू कधीही बदलणार नाहीत. आपल्याकडे या दोन ऋतुंच्यामध्ये पावसाळा येतो, तो फक्त आपल्याच देशात आहे. बाकी देशात समर, विंटर, स्प्रींग आणि रेनी यासारखे चार ऋतू आहेत.

मान्सून काही आपल्याशीच बांधलेला नाही की ७ जूनला आलाच पाहिजे. परत जाण्याची कल्पनाही तो देत नाही. तो रेंगाळत राहतो. मग आपण म्हणतो ऋतुचक्र बदलले. वास्तविक मान्सून हा एक प्रकारे नियमित आहे. शाळेच्या घंटेप्रमाणे मान्सूनचं वेळापत्रक नाही. सैन्याची परेड होते तसा तो शिस्तबद्धही नाही. आपल्या सुखाकरिताच निसर्गाने हे केले आहे.

निसर्ग आपल्या क्रॅलेंडरप्रमाणे चालत नाही. तो त्याच्या सीमेत चालतो. आपल्या सीमेत तो मजा लुटतो. `सावन आया, पिया नहीं आये' या ओळी आपल्याला आठवतात. बेचैनीतही तो आपल्याला आनंद देतो. परमेश्वरानं बऱ्याच गोष्टी मोफत दिल्या आहेत. हवा मोफत आहे, आत्ता तर एव्हरेस्टसुद्धा बरेच लोक हवेची यंत्रं न घेता चढू लागले आहेत. म्हणजेच तिथेही पुरेशी हवा उपलब्ध होत आहे. समुद्र चोहिकडे आहे, पण पिण्याच्या पाण्याचा थेंबही नाही अशी कुठेतरी अवस्था आहे. समुद्र आपल्याकरिता ईश्वराने निर्माण केले, ते कधीच आटणार नाहीत. हा समुद्र इतका प्रचंड आहे की त्यात थोडं बाष्पीभवन झालं किंवा हिमालयावरचं बर्फ वितळलं तर लगेच घाबरून जाण्याचं काही कारण नाही. हे बाष्पीभवन किंवा बर्फ वितळणं म्हणजे समुद्रातलं एक थेंब पाणी वाया जाण्यासारखं आहे. निर्मात्यानं याचा खूप विचार निश्चित केलेला असणार आहे. आधी पाणी आले की ढग आले या प्रश्नाला उत्तर नाही.
माझी विशेष सूचना आहे की, तुम्ही आकाशाकडे सतत पाहात रहा. खूप सुंदर गोष्टी आकाशामध्ये दिसतात. प्रत्येक ढग आकाराने, रंगाने वेगवेगळा असतो. इंद्रधनुष्यात किती वेगवेगळे रंग असतात. रोजचा सूर्योदय, सूर्यास्त नवनवीन असतो. निसर्गाकडे बघायची ओढ लागेल आणि त्यातूनच जाणीव होईल.
सरदारजींचे जोक्स प्रसिद्ध आहेत, तसेच हवामानाच्या अंदाजाविषयी आहे. हवामान खात्याचे अंदाज पुष्कळदा चुकतात हे मी मान्य करतो. पण कधीतरी अंदाज अचूकही ठरतात. युरोपची हवा इकडे आली तर तितकाच बरोबर व अचूक अंदाज देता येईल. अंदाज जितके मोघम तितके ते बरोबर ठरू शकतात. जितके स्पेसिफिक तेवढे ते चुकतात.
अमेरिकेत सांगतात गॉर्जेस वेदर. मोघम भाषा इंग्लंड, अमेरिका, युरोपात वापरतात. ती बऱ्याच लोकांना आवडते. युरोपमध्ये हवेचे सगळे प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वर्षभर वाहात असतात. त्यामुळे तिथे अचूक अंदाज सांगता येतो. वर्षभर तिथे रिमझिम पाऊस पडतच असतो, त्यामुळे तिकडे पाऊस पडणार हे सांगणं सोपं असतं. आपली हवा खालून वर वाहते. युरोपात सगळे ढग खिडकीतून खाली दिसतात. आपले सगळे ढग आकाशात उंच उंच वाहताना दिसतात. कोल्हापूरचा ढग सातारला येत नाही. तो कोल्हापूरलाच जातो. आपल्याकडे चार महिने सतत पाऊस कधीही पडत नाही. तो पडूही नये. त्यामुळेच ड्नयस्पेल आणि वेटस्पेल असे दोन भाग निर्माण होतात. निसर्गानेच ही व्यवस्था निर्माण केलेली आहे.
परंपरागत ज्ञान आणि शास्त्रीय ज्ञान यांचे काही भांडण असू नये. पारंपारिक ज्ञानाचे जे थंबरूल्स असतात, ते बऱ्याचदा लोकली असतात, ट्नन्सपोर्टेबल नसतात. एखाद्या ठिकाणाकरिताचा तो अंदाज असतो. या दोन्हींची सांगड घालण्याचं काम फार कठीण आहे. सध्या हवामान वेधशाळेतून थेट शेतकऱ्यांना हवामानासंंबंधीचे अंदाज देणारे एस.एम.एस. जातात. हवामानात पुष्कळ प्रक्रिया समांतर चालू असतात.
अर्ध्या तासात ढग काळाकुट्ट होतो. अर्ध्या तासात तो नाहीसा होतो. सगळीकडे लाल आभाळ पाहिलं म्हणजे संध्याकाळी पाऊस पडेल हे खरं नाही. हवामानशास्त्राचे जीवन दोनशे-तीनशे वर्षांचे आहे. शेतकरीपण पुष्कळदा चुकतो. शेवटी पाण्याचे नियोजन चांगले व्हावे हा त्यातला सगळयात महत्त्वाचा गाभा आहे.
आपला मान्सून हा ठराविक काळाचाच आहे. दोन ते चार महिनेच तो पडतो. कायमचा इशारा दिलेला आहे, चार महिनेच मी तुमच्याजवळ आहे. तेव्हा बाकी आठ महिन्यांची सोय तुमची तुम्ही करा. आपण जानेवारीतच दुष्काळ जाहीर करतो आहोत हे चुकीचं आहे. दुष्काळ वाट्टेल तेव्हा जाहीर करण्याची प्रथा आहे. जानेवारीपासून सहा महिने पावसाळा दूर आहे. त्या पावसासाठी भारतीय हवामान वेधशाळेचा धावा करण्याची पद्धत चुकीची आहे.  ब्रिटिशांच्या काळात दुष्काळ केव्हा जाहीर करायचा यासंबंधी कायदा होता. कलेक्टरलाच दुष्काळ जाहीर करण्याचा अधिकार होता. कुठल्याही कलेक्टरला ३१ जुलैपर्यंत वाट पाहायला लागायची. आपण आज कुठलेच नियम पाळत नाही. सवंग लोकप्रियतेच्या मागे आपले सगळे लोक लागले आहेत.
एक तारखेला दरमहा होणारा पगार पहिल्या चार दिवसांतच उडवून टाकला तर पुढचे २५-२६ दिवस जशी तारांबळ होते तशीच अवस्था मान्सूनची आहे. चार महिने पडणारा पाऊस पुढचे आठ महिने आपण जपून, पुरवून वापरला पाहिजे. पण आता आपल्याला मान्सूनच्या सगळया पावसाची उधळपट्टी करण्याची सवय लागली आहे. नवीन जीवनशैलीप्रमाणे आधी सगळं खर्च करून टाकायचे आणि मग लोन काढायचे, ही माणसाची प्रवृत्ती आहे. पण पाण्याचं कर्ज कधीही कोठूनही मिळत नाही. मग म्हणायचं, `नद्या जोडून टाका.' हा मूर्खपणा आहे.

पवनचक्क्यांमुळे पाऊस अडतो का?
हल्ली एक फॅशन झाली आहे. कुठलाही चांगला प्रकल्प हाती घेतला की सगळे पर्यावरणवादी त्याच्या विरोधात लगेच उभे राहतात. पवनऊर्जा कशाकरिता पाहिजे, १२१ कोटी जनतेला अन्न, पाणी, ऊर्जा हवं आहे. पवन व सौरऊर्जा हे दोन्ही फुकटात मिळतात. पण सगळीकडे वारा चोवीस तास सारख्याच वेगाने वाहात नाही. थंडीत सूर्य फार क्षीण असतो. उन्हाळयात तो कडक  असतो. पुष्कळ गोष्टीत आपला देश श्रीमंत आहे. `सन नेव्हर सेट्स इन इंडिया' असं म्हणतात ते उगीच नाही. पवनऊर्जा काही ठिकाणी खूप वाहते. दोन डोंगराच्या मधून वेगाने वारा वाहताना दिसतो. या पवनऊर्जेवर आपण आणखी संशोधन करण्याची गरज आहे. साताऱ्यात पवनचक्क्या लावण्यात आल्या होत्या आणि त्याचवेळी दुष्काळ पडला होता. आपल्याला निष्कर्ष काढण्याची खूप घाई झालेली असते. लगेच ब्रेकिंग न्यूज आली की, पवनचक्क्यांमुळे वारा अडला, ढग वाहिले नाहीत आणि पाऊस पडला नाही. वास्तविक या पावसाचा आणि पवनचक्क्यांचा काडीचाही संबंध नाही. पवनचक्क्या चांगल्या आहेत, उपयुक्त आहेत. या पवनचक्क्यांचा आकार, त्यांची उंची किती? आणि ढगाचे आकारमान आणि उंची किती! याचा कधी कुणी विचारच करीत नाही. इंग्लंडपासून जपानपर्यंत आशिया खंड एवढा मोठा आहे की त्याच्यावर येणारे ढग संख्येने किती विपुल आणि त्या तुलनेत या पवनचक्क्या किती टिचभर. पण आपण बोलताना कशाचाही विचार करीत नाही. पवनचक्क्यांमुळे पाऊस अडतो हे म्हणणं म्हणजे मुंग्यांनी वाघ खाल्ला असं म्हणण्यासारखं आहे. हा आक्षेप घेणं सुद्धा चुकीचं आहे. पवनचक्क्यांचा मान्सूनवर काहीही परिणाम होत नसतो. आपला मान्सून खूप बलशाली आहे. त्याच्याशी कुणीही झुंज घेऊ शकत नाही.
मान्सूनचा जगाच्या इतर भागावर परिणाम होतो का? मुख्य म्हणजे पृथ्वीचे सगळे वातावरण एकच आहे. मान्सूनला कोणी पासपोर्ट, व्हिसा विचारत नाही. त्याला मोकळीक आहे कुठेही जाण्याची. प्रगत देशांनी जो कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात ओतला तोच आपल्याकडे आला. गिलबर्ट वॉकर यांनी हे शोधून काढलं. एलनिनोचं संशोधन भारतात १९२० साली झाले होते. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ झाली, त्यामुळे एलनिनो आणि पाऊस यांचं को-रिलेशन लावले गेले. आमचा पाऊस चांगला म्हणून बर्फ चांगलं पडलं, असेही काही लोक म्हणतात. काहीजण तर याच्याही पुढे जाऊन आणि विशेषत: परदेशातले तज्ज्ञ `तुमचा गेट वे ऑफ इंडिया बुडेल, हिमालय वितळेल' अशा प्रकारची भाकितं करतात. हे सगळं खोटं आहे. आपल्याला कमी लेखणं (नीचा दिखाना) हेच त्यांचे सूत्र आहे. परदेशी शास्त्रज्ञ म्हणतात तसं इथं काहीही घडणार नाही. आमच्या  मान्सूनला काहीही होणार नाही. ग्लोबल सर्क्युलेशनमध्ये तो कंट्नेलिंग फॅक्टर आहे. जपानमध्ये जे टायफोन्स येतात, ते भयंकर असतात. जिओ इंजिनियरिंग नावाचं नवं शास्त्र निघालं आहे. ते बरेच कल्पकतेवर आधारलेलं आहे. चिंता करून दु:खी व्हायचं असेल तर बरेच विषय आहेत. क्रूर मॉडेल्सही असतात. पृथ्वीचा अक्ष कलला का, अणुयुद्ध खरंच होईल का? असे विचार उगीच करू नयेत.
कृत्रिम पाऊस म्हणजे काय? त्याचा किती उपयोग होतो?
जेव्हा आपल्याकडे खरोखरच नड असते तेव्हा आपण या कृत्रिम पावसाचा विचार करतो. दुर्दैवाने या विषयावर भरपूर संशोधन निदान अजून भारतात झालेले नाही. १९६० पासून आपल्याकडे कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. हा पाऊस पाडणे हे फार सोपं काम आहे. ढगांत मिठाची फवारणी करून बिंदू मोठे करायचे, त्याचे वजन वाढवायचे की ते खाली पडतात. वास्तविक हे प्रयोग वरचेवर करीत राहिले पाहिजे. पण पाऊस चांगला असेल तेव्हा आपण हे प्रयोग टाळतो. मतदारसंघात पाऊस पाडून घ्यावा अशी लोकप्रतिनिधींची इच्छा असते. पण यात काही नैतिक व कायद्याचे मुद्दे आहेत. त्याकडे कुणीच लक्ष देत नाही. ढगातला सगळा पाऊस जर महाराष्ट्ननं पाडून घेतला तर आंध्रानं काय करायचं? त्यांनी पावसासाठी न्यायालयात जायचं का? सगळया देशाचा पाऊस आपल्याच राज्यावर आपण पाडून घेऊ शकत नाही. जगात कुठल्याही देशात सतत प्रयोग चालू असतात. दुसऱ्याचं पाणी आपण ओढून घ्यावं का? हा नैतिक मुद्दा आहे. कृत्रिम पाऊस पाडणं खूप सोपं आहे. त्यात फार कठीण गुंतागुंतीचं शास्त्र नाही. पण त्यासाठी आधी आकाशात ढग असले पाहिजेत. हे ढग आपण निर्माण करू शकत नाही.
लोकांना सगळे `नेक टू ऑर्डर' व `इन्स्टंट' पाहिजे. उद्याकरिता थांबण्याची लोकांची तयारी नाही. पाहिजे त्यावेळी आणि पाहिजे तेवढा पाऊस पडला पाहिजे, अशी लोकांची स्वार्थी प्रवृत्ती आहे. प्रत्यक्षात हवामान विभागात नोकरी करताना मी २३ वर्षे दिल्लीत राहिलो आणि ४२ वर्षे या क्षेत्रात काम करतो आहे. दिल्लीत प्रचंड दाट धुके पडते. थंडी खूप असते. प्रत्येक क्षणी हवामान आडवे येते. गारा पडलेल्या कुणालाच आवडत नाहीत. वळवाच्या पावसावर कितीतरी गाणी लिहिली गेली. आपण त्याला नाव दिलं `अवकाळी पाऊस' जो आपल्याला नकोच आहे. हा पाऊस झाला की लगेच हेडलाईन येते `पाच कोटीचं आंब्याचं नुकसान'! कसा हिशोब लावला बाबा हा?
रोजच्या हवामानाबद्दल माणसांना माहिती पाहिजे. तंत्रज्ञान खूप विकसित झालेले आहे पण त्याला पॅरलल असं जीवनही विकसित झालेले आहे.
अतिवृष्टी का होते याला पुष्कळ कारणं आहेत. आपण जिथे आहोत ते क्षेत्र मान्सूनमध्ये येते. उत्तरेत ज्याला ढगफुटी म्हणतात, कधी कधी ढगांचं तसं होतं. त्यामुळेही प्रचंड पाऊस पडतो. कधी कधी मान्सूनचा प्रवाह खूप स्ट्नँग असतो. तो कोणीच टाळू शकत नाही. २००५ मध्ये मुंबईत असाच ९८ मिमी. पाऊस झाला होता. मुंबईत एके ठिकाणी म्हणजे सांताक्रूझमध्ये ९४१ मि.मी.पाऊस नोंदवला गेला. त्याच वेळी मुंबईतील दुसऱ्या एका ठिकाणी फक्त ७३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढते आहे, त्यामुळे पावसाचे प्रमाण बदलू शकते. आपण त्याचा उगीच बाऊ करू नये. आपल्या पिकांना जास्त तापमानाची सवय आहे. राजस्थानच्या वाळवंटात अर्धा डिग्रीने तपमान वाढले तर काहीही फरक पडणार नाही. पावसासंबंधीच्या प्रत्येक मॉडेलचा निष्कर्ष निरनिराळा आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ३ ते १९ टक्क्यांपर्यंत पाऊस वाढेल असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करतात. त्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंग आपल्याकरिता चांगले आहे. हिमालयाचा बर्फ पूर्णपणे कधीही वितळणार नाही. तेव्हा याबाबत घाईने कुणीही मत मांडू नये.

भविष्यकाळात हवामानाविषयी किती अचूक अंदाज देता येतील?
अंदाजाविषयी अंदाज द्यावा, हे डेफिनेटली चुकेल. भविष्य जाणणं हे मानवाचं काम नाहीच. हवामान शास्त्रज्ञ हे भविष्यवादी नाहीत. विज्ञानाचा नियमित डेटा वापरून ते अंदाज सांगत असतात. इनिशिअल डेटा जेवढा चांगला तेवढा अंदाज अचूक. पृथ्वीच्या दोन तृतीयांश भागावर समुद्र आहे. तेथला डेटा कुठून आणणार? आज मिसमॅच डेटा मोठा आहे. त्यामुळे शंभर टक्के बरोबर अंदाज देता येणार नाही. मोघम फोरकास्ट दिले तर तो शंभर टक्के बरोबर येण्याची शक्यता आहे. सगळयांचेच पावसाचे अंदाज चुकतात. सुदैवाने आपलं भविष्य उज्ज्वल आहे. सगळी सामान्य जनता जागृत झाली आहे. हवामानाविषयी तिला खूप आस्था आहे. १८० देश दरवर्षी जगात कुठेतरी भेटून  हवामानाची चर्चा करतात. पृथ्वीची काळजी करायला ते तयार झाले आहेत. लोकांना हवामानाविषयी चर्चा करून आश्वस्त करतात हे फार चांगले लक्षण आहे.    
(`राष्ट्न्वादी'तून साभार..)

डॉ.रंजन केळकर
सी-७, निरंजन कॉम्प्लेक्स
१२१/१ सुस रोड, पाषाण, पुणे २१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन